ग्रामोन्नती मंडळ
कृषि विज्ञान केंद्र
नारायणगाव तालुका - जुन्नर जिल्हा -पुणे
ENGLISH / मराठी

संस्थेविषयी स्टाफ उपक्रम जिल्ह्याची माहिती संशोधन केंद्र छायाचित्रे पब्लिकेशन लिंकेज
होम
जवळचे स्टेशन
केव्हीके इमारत
हवामान अंदाज
बाजार माहिती
उद्देश
संपर्क साधा

कृषी तंत्रज्ञान सप्ताह
२०१५

कृ.वि.के. प्रक्षेत्र

८वे राष्ट्रीय संमेलन

कृ. वि. के. प्रात्यक्षिके २०१५-१६

संस्थेविषयी

ग्रामोन्नती मंडळ :

      सन १९४४ मध्ये गुरुवर्य रा. प. सबनीस (नानासाहेब) यांनी ग्रामोन्नती मंडळ हि संस्था उभारली. ग्रामीण भागातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आजतागायत हि संस्था कार्यरत आहे. तसेच आज हि संस्था जुन्नर तालुक्यातील एक बहुउद्देशीय शिक्षण संस्था म्हणून कार्यरत आहे. गुरुवर्य नानासाहेब सबनीस एक उत्तम शिक्षण तज्ञ होते. ग्रामीण भागातील शेतकरयांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे यासाठी ते नेहमीच आग्रही असत आणि हीच परंपरा आजही ग्रामोन्नती मंडळाच्या माध्यमातून चालू आहे. कृषी शिक्षण, पशुसंवर्धन, शेळीपालन, विपणन व्यवस्थापन इ. शिक्षण मंडळाच्या माध्यमातून चालविले जात आहे.

कृषी विज्ञान केंद्र :

      आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकरयांच्या शेतावर कमी वेळात सक्षमरीत्या पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हास्तरावर कार्यरत असणारया कृषी विज्ञान केंद्राची स्थापना सन २०१० साली ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव (पुणे) येथे भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या मार्फत करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रात उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, मुळशी तालुके येतात. कृषी विज्ञान केंद्र आपल्या कार्यक्षेत्रातील कृषीच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. जिल्ह्यामध्ये करताना कृषी विज्ञान केंद्र राज्य शासनाच्या कृषी विभाग, जिल्ह्याचा कृषी आणि ग्रामीण विभाग तसेच परीक्षेत्रामध्ये येणाऱ्या केंद्र शासनाची संशोधन केंद्रे, कृषीशी संबंधित काम करणाऱ्या गैर शासकीय संस्था आदींना बरोबर घेऊन कार्य करते. तसेच कृषी विज्ञान केंद्र शासनाचे ग्रामीण भागामध्ये काम करणारी एक सामाजिक यंत्रणा म्हणूनही ओळखली जाते.

            
        कॉपीराईट © २०१4 कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव
विकसित- विनोद शि. जाधव, कार्यक्रम सहाय्यक,संगणक , कृ.वि.के. नारायणगाव Count Visitors