ग्रामोन्नती मंडळ
कृषि विज्ञान केंद्र
नारायणगाव तालुका - जुन्नर जिल्हा -पुणे
ENGLISH / मराठी

संस्थेविषयी स्टाफ उपक्रम जिल्ह्याची माहिती संशोधन केंद्र छायाचित्रे पब्लिकेशन लिंकेज
होम
जवळचे स्टेशन
केव्हीके इमारत
हवामान अंदाज
बाजार माहिती
उद्देश
संपर्क साधा

कृषी तंत्रज्ञान सप्ताह
२०१५

कृ.वि.के. प्रक्षेत्र

८वे राष्ट्रीय संमेलन

कृ. वि. के. प्रात्यक्षिके २०१५-१६

कृषी विज्ञान केंद्राची उद्दिष्टे

१. कृषी आणि कृषी पूरक व्यवसायाच्या उत्पादन वाढीस चालना देणे.
२. प्रात्यक्षिकाद्वारे शिक्षण देणे व प्रत्यक्ष कर्यनुभवने कार्यानुभवाने शिक्षण घेणे या प्रमुख शिक्षण पद्धतीद्वारे शेतकरी, युवक, महिलांना त्यांचा व्यवसायातील कार्यकुशलता वाढविण्याचे प्रशिक्षण देणे.
३. समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल तसेच मागासलेल्या जाती-जमातीतील घटकांना घटकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या आर्थिक- सामाजिक जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणे.
४. जिल्ह्यातील नैसर्गिक साधन सामुग्री, पिके, भौगोलिक परिस्थिती आणि विविध संस्था या विषयीची माहिती मिळविणे व त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण विषयीच्या गरजा आणि अभ्यासक्रम ठरविणे. तसेच कुटीरोद्योगाचे प्रशिक्षण आयोजित करणे.
५. शिवार फेरी, शेतकरी मेळावे, परिसंवाद, कृषी दिन, शैक्षणिक सहली, अभ्यास दौरे, कृषी प्रदर्शन, वृत्तपत्रे व मासिके, दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी कार्यक्रमांद्वारे तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे.
६. ग्रामीण महिलांसाठी परिवार नियोजन, सार्वजनिक आरोग्य, गृहव्यवस्था, आहार पद्धती, बालसंगोपन तसेच स्वयंरोजगारभिमुख अशा व्यवसायाचे प्रशिक्षण देणे.
७. ग्रामीण युवकांमध्ये कृषी आणि कृषिपूरक व्यवसायाची आवड व शास्त्रीय दृष्टीकोन निर्माण व्हावा या हेतूने खेडयात कृषी विज्ञान मंडळाची स्थापना करणे .
८. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्राचा प्रात्यक्षिक प्रक्षेत्र म्हणून विकास करणे. तसेच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभवाद्वारे प्रशिक्षण देणे.
९. शाळा, कॉलेजातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, इत्यादीसाठी प्रक्षेत्रावर सहलीचे आयोजन करून त्याद्वारे शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान त्यांचाच कुटुंबापर्यंत पोहोचविणे.
१०. ग्रामीण समाजातील दुर्बल घटकांसाठी उत्पादनाभिमुख व गरजावर आधारित ठराविक कालावधीचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे.
            
        कॉपीराईट © २०१4 कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव
विकसित- विनोद शि. जाधव, कार्यक्रम सहाय्यक,संगणक , कृ.वि.के. नारायणगाव Count Visitors